• Download App
    गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त!!|Big drop in gas prices; Commercial cylinder cheaper by Rs 83.5!!

    गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किमतीत मोठी कपात झाली आहे. आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता. परंतु, घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.Big drop in gas prices; Commercial cylinder cheaper by Rs 83.5!!

    यापूर्वी मार्च महिन्यामध्ये घरगुती सिलेंडरच्या (LPG Gas) किमतींत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजीच्या दरात मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103 रुपये, जयपूरमध्ये 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपये इतकी किंमत आहे.



    गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा (LPG Gas) दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपये आहे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे.

    मुंबईतील दर काय?

    मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर (LPG Gas) 1725 रुपयांना विकला जात आहे, तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1856.50 रुपयांवरून 83.50 रुपयांनी कमी होऊन 1773 रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाला असून 1808.50 रुपयांवरून 1725 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. तसेच, चेन्नईमध्ये एलपीजी (LPG Gas) गॅस 2021.50 रुपयांवरून 84.50 रुपयांनी घसरून 1937 रुपयांवर पोहोचला आहे.

    Big drop in gas prices; Commercial cylinder cheaper by Rs 83.5!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज यांनी गांधी कुटुंबाला एका खास ‘बॅग’द्वारे केले लक्ष्य

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!