• Download App
    केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यावर दिल्लीत बंदी Big decision of Kejriwal government ban on bursting firecrackers in Delhi on Diwali

    केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यावर दिल्लीत बंदी!

    दिल्लीत फटाक्यांवर बंदी असतानाही कोणी विरुद्ध वागल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेत दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. हिवाळ्यात वाढणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याच कृती आराखड्याअंतर्गत दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत फटाक्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. Big decision of Kejriwal government ban on bursting firecrackers in Delhi on Diwali

    अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यावर बंदी असणार आहे. राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या केजरीवाल सरकारने आज हा निर्णय घेतला आहे.

    यासंदर्भात दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, सरकारने फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांना यासाठी परवाना न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, दिल्ली सरकारने राज्याच्या सीमावर्ती भागात फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. दिल्लीत फटाक्यांवर बंदी असतानाही कोणी असे केल्यास त्याच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

    या संदर्भातील फाईल दिल्लीच्या पर्यावरण विभागाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवली होती. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर ही फाईल राज्यपालांकडेही पाठवण्यात आली आहे. राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही अधिसूचना जारी केली जाईल. फटाक्यांवरील ही बंदी अधिसूचनेच्या तारखेपासून नवीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे.

    Big decision of Kejriwal government ban on bursting firecrackers in Delhi on Diwali

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!