• Download App
    केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवर बंदीBig decision of central government; After wheat, now export of sugar is banned

    केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवर बंदी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. साखरेचा हंगाम २०२१-२०२२ च्या काळात साखरेच्या घरगुती उत्पादनाची उपलब्धता आणि मूल्य स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. Big decision of central government; After wheat, now export of sugar is banned

    मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आदेश येईपर्यंत साखरेच्या निर्यातीला रेग्युलेट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. १०० लाख मॅट्रिट टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. वाढती महागाई आणि खाद्य सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय केंद्राने घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयापूर्वी देशात गव्हाचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.



     

    १ जूनपर्यंत कच्च्या आणि पांढऱ्या साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत यूरोपीय संघ आणि अमेरिकेला निर्यात करण्यात येणाऱ्या साखरेवर बंदी घालण्यात येणार आहे. सीएक्सएल आणि टीआरक्यू या क्षेत्रानुसार, एका निश्चित प्रमाणात साखरेची निर्यात केली जाणार असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचनालयाने सांगितले आहे.

    Big decision of central government; After wheat, now export of sugar is banned

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती