मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’वर दिली माहिती Big decision of Assam government Muslim marriage law canceled
विशेष प्रतिनिधी
आसाम : आसाम सरकारने आज मोठा निर्णय घेत मुस्लिम विवाह कायदा रद्द केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. “आम्ही आमच्या मुली आणि बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बालविवाहा विरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय सुरू केले आहेत.” असे त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
आज आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आम्ही Assam Repealing Bill 2024 द्वारे आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशीही माहिती मुख्यमंत्री सरमा यांनी दिली आहे.
हे विधेयक आसाम विधानसभेच्या पुढील पावसाळी अधिवेशनात विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यात मुस्लिम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभेच्या पुढील अधिवेशनात यावर विचार केला जाईल.
Big decision of Assam government Muslim marriage law canceled
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!!