दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराच्या ( Vaishno Devi Yatra ) नवीन मार्गावर दरड कोसळली आहे. यात अनेक भाविक अडकले आहेत.
टीव्ही रिपोर्ट्सनुसार, दोन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही लोक जखमी झाले असून अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून समोर आलेल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर बराच मलबा पडल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी 2.35 च्या सुमारास इमारतीच्या तीन किमी पुढे पंछीजवळ भूस्खलन झाले, ज्यामुळे वरच्या लोखंडी संरचनेचा एक भाग देखील खराब झाला.
भूस्खलनानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून एका महिलेसह तीन जखमी यात्रेकरूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
big crack fell on the way of Vaishno Devi Yatra
महत्वाच्या बातम्या
- Manipur : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, गोळीबारात महिलेसह 2 ठार, 9 जण जखमी; ड्रोनमधून बॉम्ब टाकल्याचा दावा
- Congress : जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा बोलबाला, पण त्यांच्यापेक्षा काँग्रेसकडेच इच्छुकांचा धावा!!; वाचा संख्या!!
- Maharashtra heavy rain : महाराष्ट्रात पुढील 4 पावसाचा इशारा, मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांत मुसळधार पाऊस; संभाजीनगर, जळगावला ऑरेंज
- Manoj Jarange : महायुती + महाविकास आघाडीतल्या नाराजांना जरांगेंच्या उमेदवारीचे दरवाजे सध्यातरी बंद!