• Download App
    लोकसभा निवडणुकीत लहान पक्षांचे मोठे आव्हान; मागच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या 145 जागा|Big challenge of small parties in Lok Sabha elections; 145 seats were won in the last election

    लोकसभा निवडणुकीत लहान पक्षांचे मोठे आव्हान; मागच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या 145 जागा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लहान प्रादेशिक पक्षांचे निवडणुकांमध्ये नेहमीच मोठे आव्हान असते. 2019च्या निवडणुकीत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्यांमध्ये पसरलेल्या प्रादेशिक पक्षांनी 145 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये भाजप-काँग्रेससोबत आघाडी करून मिळवलेल्या अनेक जागांचाही समावेश आहे.Big challenge of small parties in Lok Sabha elections; 145 seats were won in the last election



    2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशात 97 जागा अशा होत्या जिथे काँग्रेस आणि भाजप क्रमांक एक आणि दोन वर कुठेही दिसत नव्हते. यातील बहुतांश जागा दक्षिण भारतातील होत्या. प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ जागांसाठी मुख्य लढत जमनमोहन रेड्डी यांच्या वायआरएस काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांच्यात होती. वायएसआर काँग्रेसने चमकदार कामगिरी करत 22 जागा जिंकल्या. टीडीपी 3 जागांवर घसरली. भाजप व काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

    दक्षिणेत हा घटक महत्त्वाचा असल्याने काँग्रेसचे नुकसान

    अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम आणि द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन प्रमुख राजकीय पक्ष तामिळनाडूमध्ये सत्तेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमकेला जबरदस्त यश मिळाले होते. द्रमुक आघाडीने राज्यातील 39 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या, तर एआयएडीएमकेला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

    1962 मध्ये काँग्रेसने तामिळनाडूत शेवटच्या वेळी सरकार स्थापन केले. यानंतर द्रमुकचे वर्चस्व सुरू झाले. 1972 मध्ये एमजीआरने एआयएडीएमकेची स्थापना करून तामिळनाडूतून काँग्रेसची जवळपास हकालपट्टी केली. यानंतर फक्त द्रमुक आणि अण्णाद्रमुक उरले. काँग्रेसला 2014 मध्ये 4.3% आणि 2019 च्या निवडणुकीत 12.6% मते मिळाली.

    Big challenge of small parties in Lok Sabha elections; 145 seats were won in the last election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!