Shopian Encounter : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे. Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces
वृत्तसंस्था
जम्मू कश्मीर : जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काउंटरदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या एन्काउंटरमध्ये जवानांनी बुऱ्हान वानीचा चुलत भाऊ इम्तियाज शाहचा खात्मा केला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत शोपियांमध्ये कालपासून एन्काउंटर सुरू होते. या मोहिमेत सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार झालेला कुख्यात दहशतवादी इम्तियाज शाह हा गजवा-ए-हिंदचा कमांडर होता. घटनेनंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम आणखी वेगवान केली आहे.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी त्रालमधील चकमकीदरम्यान अन्सार गजवात-उल-हिंद एजीएचचा कमांडर इम्तियाज शाह हा ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांच्या जान मुहल्लामध्ये सुरू असलेल्या चकमकीत पाच, तर त्रालमध्ये 2 दहशतवादी ठार झाले आहेत.
या चकमकींमध्ये सैन्यातील एका अधिकाऱ्यासमवेत चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी सैन्याच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Big Breaking Shopian Encounter Burhan Wani’s brother killed by security forces
महत्त्वाच्या बातम्या
- लसीच्या तुटवड्यावरून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले- लसींचा अभाव गंभीर समस्या, ‘उत्सव’ नव्हे!
- दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटवर कमी प्रभावी अॅस्ट्राझेनेकाची लस, देशाने थांबवला वापर; सीरमनेही रिफंड केले पैसे
- IPL 2021 : आजपासून IPL स्पर्धेला सुरुवात, MI आणि RCB मध्ये होणार पहिला मुकाबला
- भारत-चीनदरम्यान आज चुशुलमध्ये चर्चेची 11वी फेरी, तणाव निवळण्यासाठी आणखी प्रयत्नांवर देणार भर
- उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपचे पंचायत निवडणूकीत तिकीट