विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्याच्या तयारीत असलेल्या ‘इंडिया’ आघाडीला त्यांच्याच घटक पक्षांकडून वारंवार झटके बसत आहते, आता विरोधकांच्या या आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण, ‘सीपीआय-एम’ने ‘इंडिया’ आघाडीपासून वेगळे होऊन बंगाल आणि केरळमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांत ममता बॅनर्जी यांची तृणमूल आणि काँग्रेस हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. big blow to the oppositions INDIA alliance CPIM rejects alliance in Bengal Kerala
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआयएमने बंगालमधील काँग्रेस आणि तृणमूल या दोन्ही पक्षांपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याच्या प्रयत्नात एकजुटीने लढण्याचे उद्दिष्ट असलेल्या विरोधी आघाडीतील त्रुटींचा पर्दाफाश केला आहे. यासोबतच समन्वय समितीच्या बैठकीत कोणत्याही प्रतिनिधीचे नाव न देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीत सीपीएम पॉलिट ब्युरोच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर विरोधी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी हे निर्णय रणनीतीचा भाग असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. सीपीआयएम गेल्या आठवड्यात झालेल्या ‘इंडिया’ समन्वय समितीच्या बैठकीत सहभागी झाले नव्हते. 14 सदस्यीय पॅनेलमध्ये एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती. बैठकीनंतर सीपीएम पॉलिट ब्युरोच्या निवेदनात या निर्णयांचा उल्लेख नाही.तर ऑन रेकॉर्डवर, ते आघाडी मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
देशभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी पाटणा, बंगळुरू आणि मुंबई येथे झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या गेल्या तीन बैठकांमध्ये पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे पॉलिटब्युरोने म्हटले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भोपाळमधील ‘इंडिया’ आघाडीची रॅली रद्द केल्यानंतर, सीपीआयएमने समन्वय समिती आणि निवडणूक रणनीती समितीसाठी आपल्या प्रतिनिधीचे नाव देण्यास नकार दिलेला आहे.
big blow to the oppositions INDIA alliance CPIM rejects alliance in Bengal Kerala
महत्वाच्या बातम्या
- Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा
- विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींची त्रिस्तरीय पडताळणी; अर्थमंत्री म्हणाल्या- एमएसएमई मंत्रालय हमीशिवाय ₹ 3 लाखांचे कर्ज देणार
- गुगलच्या सह-संस्थापकाचा पत्नी शानाहानशी घटस्फोट; एलन मस्कशी अफेअरची चर्चा
- CJI चंद्रचूड म्हणाले- तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही; वकिलांना म्हणाले- तुमची भरभराट होईल की नाही हे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून