• Download App
    बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकारला मोठा झटका; उच्च न्यायालयाने जात जनगणनेवर घातली बंदी! Big blow to Nitish Tejashwi government in Bihar High court ban on caste census

    बिहारमधील नितीश-तेजस्वी सरकारला मोठा झटका; उच्च न्यायालयाने जात जनगणनेवर घातली बंदी!

    बिहार सरकारने गेल्या वर्षी जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमधील नितीश सरकारला मोठा झटका बसला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने तत्काळ प्रभावाने जात जनगणनेवर बंदी घातली आहे. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे. Big blow to Nitish Tejashwi government in Bihar High court ban on caste census

    नितीश सरकार गेल्या अनेक वर्षांपासून जात जनगणना करण्याच्या बाजूने आहे. नितीश सरकारने 18 फेब्रुवारी 2019 आणि पुन्हा 27 फेब्रुवारी 2020 रोजी बिहार विधानसभा आणि विधानपरिषदेत जात जनगणनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, केंद्राने याला विरोध केला आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जात जनगणना होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. केंद्राने सांगितले की, ओबीसी जातींची मोजणी करणे हे मोठे आणि कठीण काम आहे.

    बिहार सरकारने गेल्या वर्षी जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू झाले. ते मे महिन्यापर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र आता हायकोर्टाने 3 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

    Big blow to Nitish Tejashwi government in Bihar High court ban on caste census

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार