• Download App
    Big blow to JJP before assembly elections विधानसभा निवडणु

    JJP : विधानसभा निवडणुकीपूर्वी JJPला मोठा धक्का!

    assembly elections

    हरियाणातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जेजेपीला ( JJP )मोठा झटका बसला आहे. जेजेपीचे दोन मोठे नेते देवेंद्र सिंग बबली (जे मंत्रीही राहिले आहेत) आणि संजय कबलाना यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच कारागृह अधीक्षक पदावरून व्हीआरएस घेतलेले सुनील सांगवान यांनीही सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

    सुनील सांगवान यांचे वडील सतपाल सांगवान हे हरियाणाच्या राजकारणातील दिग्गज नेते असून राज्यात मंत्रीही राहिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, हरियाणा राज्य निवडणूक सह-प्रभारी आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब आणि हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी भाजप मुख्यालयात या तीन नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी ओमप्रकाश धनखडही उपस्थित होते.



    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या तिन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे सांगितले. आज देशातील 20 राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे, त्यापैकी 13 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन झाले आहे.

    ते पुढे म्हणाले की, हरियाणात भाजपच्या बाजूने राजकीय वारे वाहू लागले आहेत, लोक राज्यात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच जनतेसाठी केलेल्या 108 कामांची माहिती दिली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजप सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन इतर पक्षांचे नेते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आणि काँग्रेसचा सफाया होणार हे निश्चित आहे. जिंदमध्येही नुकतेच अनेक नेते आणि हजारो तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    बिप्लब कुमार देब यांनी देवेंद्र सिंग बबली, संजय कबलाना आणि सुनील सांगवान यांचे पक्षात स्वागत केले आणि दावा केला की हरियाणात भाजप तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवून सरकार स्थापन करणार आहे. यापूर्वी जिंदमध्येही तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    Big blow to JJP before assembly elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले