• Download App
    Ghulam Nabi Azad निवडणुकीपूर्वी गुलाम नबी आझाद

    Ghulam Nabi Azad : निवडणुकीपूर्वी गुलाम नबी आझाद यांना मोठा धक्का

    Ghulam Nabi Azad

    डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या चार उमेदवारांनी सोडलं निवडणुकीचं मैदान


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (  Ghulam Nabi Azad ) यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीला (डीपीएपी) पुन्हा एकदा झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी दाखल केलेल्या आझाद यांच्या 10 उमेदवारांपैकी चार जणांनी आपली नावे मागे घेतली आहेत.

    ज्या उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली ते आझाद यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोडा, रामबन आणि किश्तवाड भागातील आहेत. या भागात आता फक्त अब्दुल मजीद वाणी दोडा विधानसभा मतदारसंघात आझाद यांचा झेंडा हातात धरताना दिसत आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी सध्या नामांकन फेरी सुरू आहे



    दोन दिवसांपूर्वी आझाद यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय उमेदवारांवर सोडला होता.

    आझाद यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, 25 ऑगस्टच्या रात्री आझाद यांची प्रकृती श्रीनगरमध्ये खालावली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपचारासाठी नवी दिल्लीला गेले आणि तेथे दोन दिवस एम्समध्ये दाखल होते. सध्या ते विश्रांती घेत आहेत.

    big blow to Ghulam Nabi Azad before the election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi HQ : देशभरात यूजीसीच्या नव्या नियमांचा विरोध; दिल्ली मुख्यालयाची सुरक्षा वाढवली, सरकारने म्हटले- कोणताही भेदभाव होणार नाही

    Zhang Youxia : द फोकस एक्सप्लेनर : भारत आणि EUची मदर ऑफ ऑल ट्रेड डील; भारताला काय फायदा, काय होईल स्वस्त? वाचा सविस्तर

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते