जाणून घ्या, भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले आहेत?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरविंदर सिंग लवली यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी 28 एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून लवली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार राजकुमार चौहान, नसीब सिंह, नीरज बसोया आणि माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अमित मलिक यांनी दिल्ली भाजप पक्षाच्या मुख्यालयात पोहोचून भाजपशी हातमिळवणी केली.Big blow to Congress in Delhi Arvinder Singh Lovely joins BJP
यावेळी भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसला प्रियंका गांधी हव्या होत्या, पण राहुल गांधींनी उमेदवारी दाखल केली. बेटी बचाओ बेटी पढाओ हा भाजपचा नारा आहे. बेटा बचाव, बेटा पढाओ, असा काँग्रेसचा नारा आहे.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, मी आधीच सांगितले होते की, जो दिल्लीवर प्रेम करतो तो दिल्लीला लुटणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहू शकत नाही. तर काँग्रेसचे माजी आमदार राजकुमार चौहान म्हणाले – आम्ही वेळोवेळी आमचे मत मांडू. दिल्लीतील मद्य घोटाळ्याबाबत माहिती समोर आणणार.
अरविंदर सिंग लवली म्हणाले की, पंतप्रधान मोदी, नड्डा आणि अमित शाह यांचे आभार. ज्यावेळी आम्ही हरवल्यासारखे भटकत होतो, त्यावेळी त्यांनी आम्हाला संधी दिली. आज आम्ही पाच ज्येष्ठ लोक आलो आहोत, पण देशाला मजबूत सरकार मिळावे असे अनेक लोकांना वाटते. देशाच्या विकासात पंतप्रधानांचे हात बळकट करायचे आहेत.
Big blow to Congress in Delhi Arvinder Singh Lovely joins BJP
महत्वाच्या बातम्या
- इम्रान यांनी लष्कराशी डील केल्यास ते पुन्हा पंतप्रधान होतील; PTI नेत्याचा दावा
- राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली, कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!
- 50 % आरक्षण मर्यादा आली काँग्रेस सरकारच्याच काळात, पण ती हटविण्याचे राहुल गांधींनी दिले मोदींना आव्हान!!
- वाशिममध्ये दोन कारचा भीषण अपघात, आमदाराच्या कुटुंबातील चौघांसह एकूण सहाजण ठार!