• Download App
    उत्तर प्रदेशात भाजपला बसणार मोठा धक्का; विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा इशारा Big blow to BJP in Uttar Pradesh: VHP president Praveen Togadia's warning12

    उत्तर प्रदेशात भाजपला बसणार मोठा धक्का; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपला बसणार मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. ‘भाजप की राह आसन नाही,’ असे ते म्हणाले. Big blow to BJP in Uttar Pradesh: VHP president Praveen Togadia’s warning

    प्रवीण तोगडिया हे मध्य प्रदेशातील बालाघाट येथे एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नागपुरात पोहोचले होते. त्यावेळी बोलत होते.

    दहा मार्च रोजी जाहीर होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे,त्यातही उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल की समाजवादी पक्षाची सत्ता स्थापन करेल का या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

    शेतकरी आंदोलना सोबतच, कृषी उत्पादनाला हमी भाव दिला नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता तोगडिया यांनी वर्तविली.

    युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात उशीर

    युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची भूमिका योग्यच आहे. पण, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम १५ फेब्रुवारीला सुरू करण्याची आवश्यकता होती. मात्र भारताने उशीर केल्यामुळेचं एका विद्यार्थ्यांला जीव गमावला लागला आहे ,असे तोगडिया म्हणाले. युक्रेनमध्ये उणे १० डिग्री तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे, हे निंदनीय असून विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी मंत्र्यांनी तिथे जाऊन यंत्रणा राबवावी, अशी मागणीही प्रवीण तोगडिया यांनी केली.

    Big blow to BJP in Uttar Pradesh: VHP president Praveen Togadia’s warning12

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!