अंमलबजावणी संचालनालयाने पाठवलेल्या 5 समन्सला केजरीवाल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आम आदमी पार्टी प्रमुखांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या पाच नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ईडीच्या तक्रारीवरून राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. मद्य अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. Big blow to Arvind Kejriwal summons issued by the court on the complaint of ‘ED’
नवीन उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पाठवलेल्या 5 समन्सला केजरीवाल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. ईडीने अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा चौकशीसाठी समन्स पाठवले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. त्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना बजावलेल्या नोटीसवर आम आदमी पार्टीचे वक्तव्य समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. कायद्यानुसार कारवाई करणार. ईडीचे सर्व समन्स बेकायदेशीर कसे होते ते न्यायालयाला सांगणार आहे. असेही आप कडून सागण्यात आले आहे.
Big blow to Arvind Kejriwal summons issued by the court on the complaint of ‘ED’
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!