• Download App
    भारतीय रेल्वेची मोठी घोषणा ; तिकीट दरात २५ टक्के सूट, ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रवाशांनाही होणार फायदा! Big announcement of Indian Railways 25 percent discount in Ticket rate Vande Bharat Express passengers will also get benefit

    भारतीय रेल्वेची मोठी घोषणा ; तिकीट दरात २५ टक्के सूट, ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ प्रवाशांनाही होणार फायदा!

    जाणून घ्या, नेमका कशामुळे हा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  तुम्ही जर रेल्वेने कायम प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. कारण, भारतीय रेल्वेने तिकीट दरात २५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही वजावट सर्व गाड्यांमधील वातानुकूलित कोच आणि एक्झिक्युटिव्ह क्लास डब्यांच्या तिकीट  दरांवर लागू आहे.Big announcement of Indian Railways 25 percent discount in Ticket rate Vande Bharat Express passengers will also get benefit

    पीटीआयनुसार, रेल्वे प्राधिकरणाने वंद भारत सेमी फास्ट ट्रेनचे भाडे कमी करण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र या सवलतींचा लाभ विशेष गाड्या किंवा सणांच्या काळात मिळणार नाही. रेल्वेगाड्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी रेल्वे विभागाने हे पाऊल उचलले आहे.

    सवलत त्वरित लागू केली जाणार –

    रेल्वे प्रशासनाच्या आदेशानुसार, गेल्या ३० दिवसांत ज्या भागात ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा भरल्या गेल्या त्या मार्गांवरील रेल्वेंमध्ये प्राधान्य प्रवासाची व्यवस्था सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. मूळ किमतीच्या कमाल २५% पर्यंत रेल्वे सवलत दिली जाते. इतर शुल्क पूर्वीप्रमाणेच लागू होतील. रेल्वे प्राधिकरणाने तत्काळ प्रभावाने सूट लागू करण्याचे आदेश दिले आहेत, तर आधीच बुक केलेली तिकिटे रिफंडेबल नसल्याचे सांगण्यात आले आहे.

    वंदे भारत ट्रेनसह अनेक गाड्यांच्या भाड्यात सवलत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशात म्हटले आहे की, “ही शिथिलता एसी चेअर कार आणि अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह एसी आसन सुविधा असलेल्या सर्व ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये लागू असेल.” ही सवलत मूळ भाड्यावर जास्तीत जास्त २५ टक्क्यांपर्यंतच असेल, असे सांगण्यात आले आहे. इतर शुल्क जसे की आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी, इत्यादी लागू होतील ते स्वतंत्रपणे आकारले जातील.

    पीटीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जूनपर्यंत भोपाळ-इंदूर ‘वंदे भारत ट्रेन’मध्ये फक्त २९ टक्के जागा होत्या. इंदूर-भोपाळ ट्रेनमध्ये २१ टक्के जागा बुक झाल्या होत्या. तीन तासांच्या या ट्रेनमध्ये वातानुकूलित सीट कारसाठी तुम्हाला ९५० रुपये मोजावे लागतील. एक्झिक्युटिव्ह सीट कारचे भाडे १५२५ रुपये आहे.

    Big announcement of Indian Railways 25 percent discount in Ticket rate Vande Bharat Express passengers will also get benefit

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor मधून काय मिळवले??, पाकिस्तानात “पंजाबी हार्ट लँड” वर प्रहार केले; करण थापरला ठणकावून शशी थरूर यांनी गप्पा केले!!

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे उत्तर आपल्या अटींवर देऊ; दहशतवाद्यांना घरात घुसून मारू

    ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक