• Download App
    मनोरंजन क्षेत्रातील मोठा बदल! झी आणि सोनी पिक्चर्सचे विलीनीकरण | Big announcement in entertainment world! Zee entertainment announces Merger with sony india

    मनोरंजन क्षेत्रातील मोठा बदल! झी आणि सोनी पिक्चर्सचे विलीनीकरण

    विशेष प्रतिनिधी 

     

    नवी दिल्ली: मनोरंजन विश्वातील सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे. झी एण्टरटेन्मेंटने माहिती दिली आहे की, सोनी पिक्चर्स (सोनी इंडिया) मध्ये झी एंटरटेन्मेंटचे  विलीनीकरण होणार आहे. सदर विलीनीकरणानंतर देखील पुढील पाच वर्ष पुनीत गोएंका हेच एम.डी. आणि सीईओ म्हणून काम करणार आहेत. झी मिडीया ही कंपनी या व्यवहारात सहभागी नाही. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व झी एण्टरटेन्मेंट यांचे विलीनीकरण झाले आहे. या करारावर सह्या देखील झालेल्या आहेत. या व्यवहारानंतर सोनी कडे ५२.९३%  हिस्सेदारी असेल तर झी लिमिटेडकडे ४७.७% हिस्सेदारी राहणार आहे.

    Big announcement in entertainment world! Zee entertainment announces Merger with sony india

    सोनी कंपनी झीमध्ये ११५०० कोटी या व्यवहारांतर्गत विलीनीकरण झाल्यावर गुंतवणार आहे. झीच्या संचालक मंडळाची पण याला परवानगी मिळालेली आहे. केवळ आर्थिक गोष्टींचे मूल्यांकन करण्यात आलेले नसून भविष्यातील रणनीतिक काय असेल आणि कोणत्या व्हॅल्यूवर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल हे देखील ठरवण्यात आले आहे, असे झी मीडियाच्या प्रवक्त्यानी सांगितले आहे.


    Ind vs Eng : मैदानावर जमके करेंगे राडा ! आता भर मैदानात भिडले बुमराह आणि बटलर ; पाहा व्हिडीओ


    सोनी पिक्चर्सचे एम.डी. आणि सी.इ.ओ. सिंग यांच्या भविष्यातील पदाबद्दल अजून कोणतीही माहिती पिढी आलेली नाहीये.  ह्या एकत्रीकरना नंतर दोन्ही वाहिन्यांकडे मिळून एकूण ७५ टीव्ही चॅनेल्स असतील तर २ ओटीटी(झी5 & सोनी लिव्ह) प्लॅटफॉर्म असतील. झी स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स फिल्म्स ह्यांच्या तसेच २ डिजिटल स्टुडिओच्या एकत्रीकरणामुळे आता मनोरंजन विश्वातील सर्वात मोठे नेटवर्क तयार झाले आहे. हे नेटवर्क स्टार आणि डिस्नी पेक्षाही मोठे असणार आहे.

    Big announcement in entertainment world! Zee entertainment announces Merger with sony india

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू