आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.Big announcement from the Telangana government for the families of the farmers who died during the farmers’ agitation
विशेष प्रतिनिधी
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे.ते म्हणाले की , शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.
केसीआर – मजलीस यांच्या “इलू इलू”मधून हैदराबादला मुक्त करू; अमित शहांची ग्वाही
यापूर्वी भाजप खासदार वरुण गांधी यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंजाब सरकारने पीडित शेतकरी कुटुंबांसाठी यापूर्वीच अनेक प्रकारची मदत जाहीर केली आहे.
केसीआर यांच्या घोषणेनंतर या मागणीला आणखी जोर मिळू शकतो.दरम्यान आंदोलनातील सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही केसीआर यांनी केंद्र सरकारला केली आहे.
ते म्हणाले की, तेलंगणा सरकारने कृषी कायद्यांविरोधात लढताना प्राण गमावलेल्या ७५० हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत.
Big announcement from the Telangana government for the families of the farmers who died during the farmers’ agitation
महत्त्वाच्या बातम्या
- INS Visakhapatnam : आज भारतीय नौदलात दाखल होणार INS विशाखापट्टनम ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत
- भावना गवळी यांना ईडीचे तिसरे समन्स, कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी तपास
- Railway station Name : पंतप्रधान मोदींच्या हस्ते भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन ; बदलली तब्बल २६ रेल्वे स्टेशनची नावं