पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते शाहजहान शेख यास अटक केली होती.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या बहुचर्चित संदेशखळी हिंसाचारप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने आज म्हणजेच मंगळवारी मोठा निकाल दिला आहे. कडक भूमिका घेत उच्च न्यायालयाने हिंसाचाराशी संबंधित तिन्ही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.Big action in Sandeshkhali case High Court orders CBI probe
संदेशखळीमध्ये महिलांची हिंसक निदर्शने आणि अनेक दिवस चाललेल्या राजकीय गोंधळानंतर पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते शाहजहान शेख यास अटक केली होती. शहाजहान शेख 55 दिवसांपासून फरार होते. शाहजहान शेखवर महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याचे अनेक आरोप आहेत.
पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुप्रतीम सरकार यांनी सांगितले की, उत्तर परगणा जिल्ह्यातील सुंदरबनच्या बाहेरील भागापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिनाखान पोलिस स्टेशन क्षेत्रातील एका घरातून शाहजहान शेखला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहान शेख हा त्याच्या काही साथीदारांसह घरात लपला होता. अटकेनंतर शेखला बशीहाट न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Big action in Sandeshkhali case High Court orders CBI probe
महत्वाच्या बातम्या
- भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
- ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ
- हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक
- लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!
- सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!