• Download App
    NIAची मोठी कारवाई! रियासी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजौरीतील अनेक ठिकाणी छापेमारी|Big action by NIA Raids conducted at several hideouts in Rajouri in connection with Reasi terror attack

    NIAची मोठी कारवाई! रियासी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजौरीतील अनेक ठिकाणी छापेमारी

    रियासी जिल्ह्यातील पौने भागात 9 जून 2024 रोजी संध्याकाळी शिवखोरीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) रविवारी (30 जून 2024) रियासी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. 9 जून 2024 रोजी संध्याकाळी, रियासी जिल्ह्यातील पौने भागात शिवखोरीहून कटराकडे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता, त्यामुळे बस जवळच्या खड्ड्यात पडली. या दहशतवादी हल्ल्यात एका मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला.Big action by NIA Raids conducted at several hideouts in Rajouri in connection with Reasi terror attack



    या घटनेनंतर गृह मंत्रालयाने 15 जून 2024 रोजी तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवली. याअंतर्गत एनआयएने दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्करशी (ओजीडब्ल्यू) संबंधित पाच ठिकाणांचा शोध घेतला. अटक आरोपी हकम खान उर्फ ​​हकीन दीन याने सांगितलेल्या ठिकाणी एनआयएचे पथक शोधासाठी पोहोचले होते. एनआयएच्या तपासानुसार, हकमने त्यांना (दहशतवाद्यांना) राहण्यासाठी सुरक्षित जागा, अन्न आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या.

    दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएने तपासादरम्यान दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्कर यांच्यातील संबंध उघड करण्यासाठी अनेक वस्तू जप्त केल्या. रियासी एसपीच्या म्हणण्यानुसार, आरोपी हकीन दीनने हल्लेखोरांना केवळ आश्रयच दिला नाही तर त्यांच्या हालचाली आणि कामात त्यांना खूप मदत केली, त्यामुळे ही घटना घडली. चौकशीदरम्यान हकीन दीनने त्याच्या घरी तीन दहशतवादी राहत असल्याचे उघड केले. एसपीच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी आरोपींना पैसेही दिले होते.

    जूनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घ्यावा लागला. दोन दिवसीय श्रीनगर दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “सरकार अलीकडच्या दहशतवादी हल्ल्यांबाबत गंभीर आहे. देशाच्या शत्रूंना धडा शिकवण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. शांतता आणि मानवतेचे शत्रू जम्मू-काश्मीरमधील विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.”

    Big action by NIA Raids conducted at several hideouts in Rajouri in connection with Reasi terror attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!