ED लवकरच आणखी काही मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
विशेष प्रतिनिधी
लखनऊ. ( Uttar Pradesh ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूमाफिया आणि सपाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. ईडीने बलरामपूरच्या उत्रौला मतदारसंघाचे आमदार असलेल्या हाश्मी आणि त्यांची पत्नी रोझी सलमा यांच्या लखनऊ, बलरामपूर आणि गोंडा येथे असलेल्या 8.24 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त केल्या आहेत.
यामध्ये सदनिका, शेतजमिनी आणि व्यावसायिक जमिनींचा समावेश आहे. ईडीने नुकतीच हाश्मी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली होती. ईडी लवकरच आणखी काही मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीचीही चौकशी सुरू आहे.
हाश्मी आणि त्याचे निकटवर्तीय 1984 पासून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनी ताब्यात घेऊन त्यांची खरेदी-विक्री करण्यात गुंतल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. गावातील सोसायटीच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारी कागदपत्रांमध्येही छेडछाड करण्यात आली. जमिनीच्या वापरात चुकीचे बदल करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या जमिनींवर संगनमताने व्यवसाय आणि महाविद्यालये चालवून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा तयार करण्यात आला. बलरामपूर पोलिसांनी माजी आमदार, त्यांचे भाऊ आणि अन्य साथीदारांविरुद्ध जमीन हडप आणि इतर प्रकरणांत गुन्हे दाखल केले होते.
Big action by ED in Uttar Pradesh 8.24 crore property of former SP MLA seized
महत्वाच्या बातम्या
- Mayawati : ‘आरक्षणाबाबत दुटप्पी धोरण’, म्हणत मायावतींनी राहुल गांधींवर केली टीका
- Amit Shah : प्रत्येक बुथवर 10 % मतांमध्ये वाढ, गाव पातळीवर सरपंच, माजी सरपंचांची जोड; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र!!
- Rahul Gandhi : राहुल गांधी ‘भ्रष्टाचाराच्या दुकाना’वर कारवाई करणार का? – भाजपचा सवाल
- Pulwama : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा मृत्यू ; जाणून घ्या, कसा?