Tuesday, 6 May 2025
  • Download App
    अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या निशाण्यावर बायडेन, हिलरींकडून जो बायडेन यांच्या वयाचा मुद्दा|Biden on his own party's target in the US presidential election, Joe Biden's age issue from Hillary

    अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या निशाण्यावर बायडेन, हिलरींकडून जो बायडेन यांच्या वयाचा मुद्दा

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा दाखल केला आहे. पण त्यांच्या वयाचा मुद्दा शुक्लकाष्ठ बनू लागला आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे वय डेमोक्रॅटिक पार्टीसाठी चिंतेचा मुद्दा आहे. हिलरी म्हणाल्या, बायडेनही या विषयाबाबत जागरूक आहेत.Biden on his own party’s target in the US presidential election, Joe Biden’s age issue from Hillary

    सर्व वाद गोपनीय दस्तऐवजाशी संबंधित प्रकरणात विशेष काउन्सिल रोबर्ट हुर यांच्या अहवालावरून उफाळला. या अहवालात दावा केला की, बायडेन एवढे वयोवृद्ध आहेत की, त्यांनी ओबामा सरकारमध्ये आपले उपराष्ट्राध्यक्षाच्या तारखा आणि २०१५ मध्ये मुलगा ब्ल्यूचा कॅन्सरने मृत्यू झाल्याची तारीखही लक्षात नाही. या अहवालावर बायडेन म्हणाले की, माझी स्मरणशक्ती चांगली आहे.



    यश: अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्द्यावर बायडेन पुढे

    एका अहवालानुसार, बायडेन यांचे सर्वात मोठे यश म्हणजे, जग दाेन युद्धांचा सामना करत होते तेव्हा त्यांनी गर्तेत अडकलेली अमेरिकी अर्थव्यवस्था बाहेर काढली. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धानंतरही बायडेन यांच्या काळात अमेरिकी अर्थव्यवस्थेत वेतन वृद्धी आणि बेरोजगारी कमी होताना पाहिले. बायडेन यांनी गेल्या महिन्यात ३.५३ लाख नव्या नोकऱ्या जोडल्या. लाखो विद्यार्थ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त केले आहे.

    चिंता: ७३% डेमोक्रॅट समर्थकही बायडेन यांचे वय झाल्याचे मानतात

    बायडेन यांचे वय डेमाेक्रॅटिक पार्टीसाठी चिंतेचा विषय यासाठी कारण, बायडेन यांचे वय राष्ट्राध्यक्ष पदासाठी चिंतेचा विषय आहे,असे अमेरिकी लोक मानतात. काउन्सिल रिपोर्टमुळे प्रकरण तापले आहे.नुकतेच एबीसी/इप्सोसच्या एका पाहणीत समोर आले की, ८६% अमेरिकी मतदान मानतात की, राष्ट्राध्यक्षपदाच्या बायडेन यांचे वय जास्त आहे.७३% डेमोक्रॅट मतदारही बायडेन यांना ज्येष्ठ मानतात, यामुळेही ही चिंतेची बाब आहे.जो बायडेन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वय सध्या ८१ वर्षे आहे.​​​​​​​

    Biden on his own party’s target in the US presidential election, Joe Biden’s age issue from Hillary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manipur : मणिपूरमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल; उग्रवादी संघटनांच्या ११ सदस्यांना अटक

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

    Gujarat : गुजरातमध्ये पावसाने केला कहर, १४ जणांचा मृत्यू १६ जण जखमी