• Download App
    बिभीषण श्रीरामांपुढे शरण आला; बिहारच्या सत्तांतरावर रामभद्राचार्य यांची टिपण्णी!!|Bibhishana surrendered to Sri Rama; Rambhadracharya's remarks on the transfer of power in Bihar!!

    बिभीषण श्रीरामांपुढे शरण आला; बिहारच्या सत्तांतरावर रामभद्राचार्य यांची टिपण्णी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतर झाले. नितीश कुमारांनी त्यांचा “उद्धव ठाकरे” किंवा “शरद पवार” होण्यापूर्वी भाजपच्या आघाडीची वाट धरली. या सत्तांतरावर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी बिभीषण श्रीरामापुढे शरण आला, त्याचे उदाहारण दिले.Bibhishana surrendered to Sri Rama; Rambhadracharya’s remarks on the transfer of power in Bihar!!

    नितीश कुमार मुख्यमंत्री बनल्यानंतर जगद्गुरु रामभद्राचार्य उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये बोलत होते. जे काही घडतय, ते चांगले आहे. राजकारणात हे सर्व सुरूच असते. नितीश कुमार यांना तो मान – सन्मान मिळत नव्हता. रावणाचा भाऊ बिभीषण रामच्या शरणात येऊ शकतो, तर नितीश कुमार आल्याने काय फरक पडतो? असा सवाल जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी केला.



    जिथे आधी होतो, तिथेच आलो

    नितीश कुमार यांच्यासोबत 8 आमदारंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या सर्व विभाग नितीश कुमार यांच्याकडेच राहतील. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप होईल. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुक्ती मिळाली, अशी नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. जिथे आधी होतो, तिथेच आलो. सोमवारी कॅबिनेटची पहिली बैठक होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

    हे आमच्यासाठी खूप दु:खद

    विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत संयोजक पदाच्या शर्यतीत नितीश कुमार आघाडीवर होते. काँग्रेससह त्यांनी अनेक पक्षांना एकत्र आणण्याच काम केले. पण त्यांना संयोजक बनवलं नाही. ही बाब नितीश कुमार यांना खटकली. मला कुठल्याही पदाची लालसा नाही, हे अनेकदा ते बोलले होते. आता ते एनडीए सोबत आहेत. नितीश कुमार एनडीए आघाडीत गेल्यानंतर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णन म्हणाले की, कॅप्टनने आघाडी सोडलीय, हे आमच्यासाठी खूप दु:खद आहे.

    Bibhishana surrendered to Sri Rama; Rambhadracharya’s remarks on the transfer of power in Bihar!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!