• Download App
    राम मंदिराचे पक्षपाती रिपोर्टिंग करणाऱ्या BBC चे भर ब्रिटिश पार्लमेंट मध्ये वाभाडे!!|Biased reporting of Ram Mandir by BBC in British Parliament!!

    राम मंदिराचे पक्षपाती रिपोर्टिंग करणाऱ्या BBC चे भर ब्रिटिश पार्लमेंट मध्ये वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संपूर्ण जगातल्या लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वतःला ठेकेदार समजणाऱ्या ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC ने अयोध्येतील राम मंदिराचे एकतर्फी आणि पक्षपाती रिपोर्टिंग केले, त्या पक्षपाती रिपोर्टिंगचे ब्रिटिश खासदाराने ब्रिटिश पार्लमेंट मध्ये वाभाडे काढले. ब्रिटन मधील सत्ताधारी हुजूर पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी BBC च्या पक्षपाती रिपोर्टिंग कडे ब्रिटिश संसदेचे लक्ष वेधले.Biased reporting of Ram Mandir by BBC in British Parliament!!

    अयोध्यातील मशीद पाडलेल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभे केल्याचे रिपोर्टिंग BBC ने केले. परंतु मूळात तिथले राम मंदिर पाडूनच बाबराने तिथे मशीद उभारली होती, हे सत्य BBC ने चलाखीने लपविले आणि हिंदू समाजावर ठपका ठेवला.



    मात्र बॉब ब्लॅकमन यांनी बीबीसीच्या या पक्षपाती रिपोर्टिंग वरच ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अयोध्येत बाबराने आक्रमण करून तिथले 2000 वर्षांपूर्वीचे राम मंदिर पाडले. त्या मंदिराच्या जागेवर तिथे मशीद उभारली. ती मशीद 1992 मध्ये कारसेवकांनी उद्ध्वस्त केली. तिथे भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राम मंदिर उभे राहिले. हा सत्य इतिहास BBC ने दाखवला नाही. उलट त्याचे विकृतीकरण केले. बाबरी मशीद पाडल्याचा ठपका हिंदू समाजावर ठेवला आणि बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभे राहिल्याचे अर्धसत्य रिपोर्टिंग केले. या अर्धसत्याचे बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वाभाडे काढले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यादिवशी केलेल्या भाषणाचा ब्लॅकमन यांनी आवर्जून उल्लेख केला. BBC ने ते भाषण तोडून मरोडून दाखविले, असा आरोपही त्यांनी केला. BBC ने आत्तापर्यंत भारताविषयी काय, पण अन्य देशातल्या वेगवेगळ्या वादांविषयी असेच पक्षपाती रिपोर्टिंग केले आहे. त्यावर चर्चा घडविण्याची मागणी खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली.

    Biased reporting of Ram Mandir by BBC in British Parliament!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार