हायकोर्टाची ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस; पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला होणार आहे. Bhupesh Baghels MLA is in jeopardy after leaving the post of Chief Minister
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्रीपद गमावलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची आमदारकीही आता धोक्यात आली आहे. आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात छत्तीसगड उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला होणार आहे.
माजी मुख्यमंत्री आणि पाटणचे काँग्रेस आमदार भूपेश बघेल यांच्या अडचणी कायम असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्याची सूत्रे गमावल्यानंतर आता याच निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार विजय बघेल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागितले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पाटणमधून भाजपचे उमेदवार असलेले विजय बघेल यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती की, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पाटणमधील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. ज्यावर न्यायालयाने भूपेश बघेल यांना नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले आहे. त्याची पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार आहे.
Bhupesh Baghels MLA is in jeopardy after leaving the post of Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती
- गांधी हत्येच्या दीर्घकालीन दुष्परिणामातून भारताचे व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश अंकितच; रणजित सावरकरांचा आरोप!!
- श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या इमामांविरुद्ध धमक्यांचा फतवा; इमाम आपल्या भूमिकेवर ठाम!!
- मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!