• Download App
    भुपेश बघेलांना वाटत असेल ५० वर्षे मुख्यमंत्री राहावे, पण निर्णय काँग्रेस हायकमांडच्या हातात आहे; बंडखोर मंत्री टी. एस. सिंगदेव यांचा हल्लाबोल|Bhupesh Baghel may think he should be the Chief Minister for 50 years, but the decision is in the hands of the Congress High Command; Rebel Minister T. S. Singdev's attack

    भुपेश बघेलांना वाटत असेल ५० वर्षे मुख्यमंत्री राहावे, पण निर्णय काँग्रेस हायकमांडच्या हातात आहे; बंडखोर मंत्री टी. एस. सिंगदेव यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पंजाब पाठोपाठ छत्तीसगडमधून उठलेला काँग्रेसमधील बंडखोरांचा आवाज शमण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काँग्रेस हायकमांडबरोबर चर्चा केलेले छत्तीसगडमधील बंडखोर मंत्री टी. एस. सिंगदेव यांनी आज पुन्हा एकदा आवाज टाकला आहे.Bhupesh Baghel may think he should be the Chief Minister for 50 years, but the decision is in the hands of the Congress High Command; Rebel Minister T. S. Singdev’s attack

    मुख्यमंत्री भुपेश बघेलांना वाटत असेल, की आपणच ५० वर्षे मुख्यमंत्री राहावे. पण मुख्यमंत्रीपद १० वर्षांसाठी आहे, की २ वर्षांसाठी हा प्रश्न नाही. हायकमांड जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, असे टी. एस. सिंगदेव यांनी पत्रकारांना सांगितले.



    सिंगदेव म्हणाले, की दोन भावंडांमध्ये देखील वाद असतात. इथे तर अख्खी पार्टी आहे. टीममधल्या प्रत्येक खेळाडूला आपण कॅप्टन व्हावे असे वाटतच असते. पण प्रश्न त्याच्या क्षमतेचा देखील आहे, असे वक्तव्य करून सिंगदेव यांनी भुपेश बघेल यांच्या क्षमतेवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह लावून टाकले.

    नेतृत्वासाठी मोकळी स्पर्धा व्हायला हवी. काँग्रेसची हायकमांड देईल ती भूमिका मी निभावायला तयार आहे. शेवटी कोणाला काय वाटते यापेक्षा हायकमांड काय निर्णय घेते यावर सगळ्या राजकीय बाबी अवलंबून आहेत, याकडे सिंगदेव यांनी लक्ष वेधले. या वक्तव्यांमधून सिंगदेव यांनी आपली भूमिका छत्तीसगडमध्ये संघर्षाचीच राहील पण हायकमांडशी पंगा घेण्याची राहणार नाही, असेच संकेत दिल्याचे मानले जात आहे.

    Bhupesh Baghel may think he should be the Chief Minister for 50 years, but the decision is in the hands of the Congress High Command; Rebel Minister T. S. Singdev’s attack

    Related posts

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची

    Supreme Court :न्यायालयांमध्ये शौचालयांच्या कमतरतेवर सुप्रीम कोर्ट संतप्त; 20 हायकोर्टांना म्हटले- 8 आठवड्यांत अहवाल द्या, अन्यथा गंभीर परिणाम