Gujarat New CM : भाजपचे आमदार भूपेंद्र पटेल यांनी राजभवनात गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या 15 महिन्यांपूर्वी विजय रुपाणी यांची जागा घेऊन भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले आहे. 59 वर्षीय भूपेंद्र पटेल यांची एकमताने काल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल आता गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री आहेत. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहेत. bhupendra patel takes oath as gujarat new cm amit shah congratulates to new cm
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भाजपचे आमदार भूपेंद्र पटेल यांनी राजभवनात गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीच्या 15 महिन्यांपूर्वी विजय रुपाणी यांची जागा घेऊन भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले आहे. 59 वर्षीय भूपेंद्र पटेल यांची एकमताने काल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल आता गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री आहेत. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहेत.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपचे सर्व नेते या समारंभाला उपस्थित होते. मध्य प्रदेश, गोवा, हरियाणाचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
राज्य सरकारमध्ये कधीही मंत्री नव्हते भूपेंद्र पटेल
भूपेंद्र पटेल यापूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्रीही नव्हते. विशेष म्हणजे 20 वर्षापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री बनणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यापूर्वी कधीही मंत्री नव्हते. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राजकोट विधानसभा जागेची पोटनिवडणूक जिंकून 24 फेब्रुवारी 2002 रोजी आमदार म्हणून निवडून आले.
2017च्या विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला, जो त्या निवडणुकीत विजयाचा सर्वात मोठा फरक होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेल्या पटेल यांना माजी मुख्यमंत्री आणि आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जाते. आनंदीबेन 2012 च्या निवडणुकीत या जागेवरून विजयी झाल्या होत्या.
bhupendra patel takes oath as gujarat new cm amit shah congratulates to new cm
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन, डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
- पेगासस हेरगिरी प्रकरणात केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले – एखादे सॉफ्टवेअर वापरले किंवा नाही, हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही
- मोदी सरकारकडून ब्रह्मपुत्रा नदीखालून 15.6 किमीचा दुहेरी बोगदा प्रस्तावित, आसाम ते अरुणाचल प्रवासाचा वेळ वाचणार
- अर्शद मदनींकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, आरएसएस प्रमुख चुकीचे बोलले नाहीत, संघ आता योग्य मार्गावर
- महिला विधेयक संसदेत सादर होवून झाली २५ वर्षे, भाजपच्या भुमिकेवर तृणमूल कॉंग्रेसची टीका