• Download App
    PM MODI :जय हरी विठ्ठल! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पालखी मार्गांचे भूमिपूजन ; वारकर्यांसाठी खास भेट;|Bhumi Pujan of Palkhi Marg by the hands of PM Narendra Modi

    PM MODI :जय हरी विठ्ठल! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पालखी मार्गांचे भूमिपूजन ; वारकर्यांसाठी खास भेट; कसा असेल नवा मार्ग पहा व्हिडीओ…

    • संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन होणार आहे.
    • या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.Bhumi Pujan of Palkhi Marg by the hands of PM Narendra Modi

    या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ देखील बांधला जाणार आहे.

    संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असेल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा असणार आहे. उद्या दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे.

    वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथाची निर्मिती

    दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किलोमीटर, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे 130 किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.

    असा आहे पालखी मार्ग

    पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचे लोकार्पण

    भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.

    Bhumi Pujan of Palkhi Marg by the hands of PM Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त