• Download App
    Padma Shri जनसंघ ते भाजप शतकपार भुलई भाईंचा

    Padma Shri : जनसंघ ते भाजप शतकपार भुलई भाईंचा पद्मश्री किताबाने सन्मान!!

    Padma Shri

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Padma Shri  केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कुठल्याही सरकारी शिफारशी शिवाय वेगवेगळ्या निकषांवर गुणवत्ता लोकांना शोधून पद्म सन्मान देण्यात आले. यात 2025 मध्ये असेच एक नाव समोर आले, ते म्हणजे जनसंघ ते भाजप असा प्रवास केलेल्या शतकपार भुलई भाईंचे!!Padma Shri

    जनसंघ आणि भाजपचे आमदार राहिलेल्या श्री नारायण उर्फ भुलई भाईंचा मोदी सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मान केला. भुलई भाई 1974, 1977 आणि 1980 अशा तीन निवडणुकांमधून कुशीनगर मतदार संघातून उत्तर प्रदेश मध्ये विधानसभेत आमदार बनले होते. विधानसभेत क्रॉस वोटिंग साठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी एक अटॅची भरून नोटा भुलई भाईंकडे पाठवल्या होत्या. त्या त्यांनी गोळवलकर गुरुजी आणि नानाजी देशमुख यांना दाखविल्या. त्यांच्या सल्ल्यानुसार नोटांनी भरलेली अटॅची घेऊन भुलई भाई उत्तर प्रदेश विधानसभेत गेले आणि त्यांनी विधानसभेत सभापतींसमोर फेकली. अशा पैशांनी मी विकत घेतला जाऊ शकत नाही, असे त्यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले होते.



    जनसंघ ते भाजप असा दीर्घ काळ राजकीय प्रवास केलेले भुलई भाई 1980 नंतर काही काळ ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये राहिले. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, पण नंतर ते विस्मृतीत गेले होते. परंतु कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांच्या संपर्कात ते पुन्हा आले. कुशीनगर दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी विमानतळावर अनेकदा भुलई भाईंना बोलवून भेट घेत असत. कोरोनादरम्यान मोदींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पीएमओ मधून फोन केला होता. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते देखील त्यांच्या संपर्कात होते.

    2024 मध्ये भुलई भाई 110 व्या वर्षी कालवश झाले. 2025 मध्ये मोदी सरकारने त्यांचा पद्मश्री किताब देऊन सन्मान केला.

    Bhulai Bhai honored with Padma Shri title after passing century from Jan Sangh to BJP!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य