• Download App
    भोपाळचे स्वच्छता ब्रॅँड अम्बॅसिटर रझा मुराद यांची नियुक्तीनंतर चोवीस तासांत हकालपट्टी, पंतप्रधानांवर केली होती आक्षेपार्ह टीका|Bhopal's cleanliness brand ambassador Raza Murad was expelled within 24 hours of his appointment

    भोपाळचे स्वच्छता ब्रॅँड अम्बॅसिटर रझा मुराद यांची नियुक्तीनंतर चोवीस तासांत हकालपट्टी, पंतप्रधानांवर केली होती आक्षेपार्ह टीका

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ: भोपाळचे स्वच्छता ब्रँड अम्बॅसिटर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चोवीस तासांत ज्येष्ठ बॉलीवूडअभिनेते रझा मुराद यांची हकालपट्टी करण्यात आली. मध्य प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह यांच्या सूचनेवरून पदावरून हटवण्यात आले. शहरी प्रशासन आणि विकास मंत्र्यांनी भोपाळ महानगरपालिकेला रझा मुराद यांना तात्काळ प्रभावाने पदावरून हटवण्याचे निर्देश दिले.Bhopal’s cleanliness brand ambassador Raza Murad was expelled within 24 hours of his appointment

    रझा मुराद यांची शुक्रवारीच भोपाळचे स्वच्छता ब्रॅँड अम्बॅसिटर म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, मुराद यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. प्यारे मियाँ प्रकरणातही त्यांचे नाव आले होते. त्यामुळे मंत्री भुपेंद्र सिंह यांनी मुराद यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले.



    हकलापट्टीनंतर रझा मुराद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही.

    पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी स्वखचार्ने कार्यक्रमासाठी आलो होतो. मी हॉटेलमध्येही माझ्या खचार्ने राहिलो. मी महापालिकेकडे पैसे मागितले नाहीत. हे माझे भोपाळवरील प्रेम आहे.रझा मुराद यांचे काँग्रेस पक्षाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळेही त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

    Bhopal’s cleanliness brand ambassador Raza Murad was expelled within 24 hours of his appointment

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले