• Download App
    भोपाळ : आसाराम बापूच्या आश्रमात बॉयलरमध्ये मोठा स्फोट , एकाचा मृत्यू , चार महिला जखमी|Bhopal: A big explosion in the boiler of Asaram Bapu's ashram, one killed, four women injured

    भोपाळ : आसाराम बापूच्या आश्रमात बॉयलरमध्ये मोठा स्फोट , एकाचा मृत्यू , चार महिला जखमी

    स्फोटानंतर भीतीचे वातावरण आहे. स्फोट एवढा जोरदार होता की भिंतीला छिद्र पडले तसेच विटा विखुरल्या आहेत.Bhopal: A big explosion in the boiler of Asaram Bapu’s ashram, one killed, four women injured


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आसाराम बापूच्या आश्रमात स्वयंपाक करत असताना बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला आहे.दरम्यान या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    स्फोटानंतर भीतीचे वातावरण आहे. स्फोट एवढा जोरदार होता की भिंतीला छिद्र पडले तसेच विटा विखुरल्या आहेत.पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताचा तपास करत आहेत.



    आसाराम आश्रमाच्या संचालिका दर्शना यांनी सांगितले की, सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉयलर खराब झाला म्हणून त्यासाठी मेकॅनिकला बोलावण्यात आले होते.दरम्यान मेकॅनिक बॉयलर दुरुस्त करत होता, दरम्यान त्याच वेळी स्फोट झालात्यामुळे मेकॅनिकचा मृत्यू झाला.

    अतिरिक्त एसपी संजीव सिंह यांनी सांगितले की, आसारामचा आश्रम परशिया रोडवर आहे. यामध्ये सुमारे 300 मुले शिक्षण घेतात. स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.सध्या या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

    Bhopal: A big explosion in the boiler of Asaram Bapu’s ashram, one killed, four women injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!