वृत्तसंस्था
सैफई : अयोध्येत राम भक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या स्मारकाचे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन केले. मुलायम सिंहांचे पैतृक गाव सैफई मध्ये हे भूमिपूजन झाले. यावेळी यादव परिवारातील सर्व लोक उपस्थित होतेच, पण समाजवादी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेतेही हजर होते.Bhoomipujan of Mulayam Singh’s memorial with Vedic chants
मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. अयोध्येत 1990 मध्ये श्रीराम जन्मभूमीपाशी कारसेवा झाली. मात्र त्या वेळच्या केंद्रातल्या विश्वनाथ प्रताप सिंह सरकारचा आणि उत्तर प्रदेशातल्या मुलायम सिंह यादव सरकारचा या कारसेवेला तीव्र विरोध होता. हा विरोध मोडून काढत लाखो कारसेवक अयोध्येत जमले होते. या कारसेवकांना विरोध करून बाबरी मशिदीचे जतन करण्याचा मुलायम सिंह यादवांचा हट्ट होता.
कोणत्याही परिस्थितीत एकही कारसेवक बाबरी मशिदीपाशी पोहोचताच कामा नये. बाबरी मशिदीपाशी कारसेवा होताच कामा नये, यासाठी मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले होते. परंतु तरीही कारसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी कारसेवकांचा पोलिसांशी जोरदार संघर्ष झाला. त्यामुळे संतप्त होऊन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी पोलिसांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी गोळीबार करताच रामकुमार कोठारी आणि शरद कुमार कोठारी हे दोन बंधू या गोळीबारात शहीद झाले. शेकडो कारसेवक जखमी झाले. मुलायम सिंह यांच्या आदेशानुसार पोलिसांनी कारसेवकांवर अत्याचार केले.
पण एवढे होऊनही कारसेवक बधले नाहीत. मुलायम सिंह यादव राम जन्मभूमी आंदोलन चिरडू शकले नाहीत. उलट कारसेवकांच्या प्रचंड विरोधामुळे मुलायम सिंह यादव यांचेच सरकार गडगडले. त्यानंतर कल्याण सिंहांचे सरकार आले आणि 1992 मध्ये कार सेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली.
मुलायम सिंहांचे राजकारण त्यानंतर पुढे सुरू राहिले. ते देवेगौडांच्या आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांमध्ये संरक्षण मंत्री झाले. पण पुन्हा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत.
दरम्यानच्या काळात भारताच्या राजकारणाने कूस बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचंड उदय झाला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस हे पक्ष नगण्य उरले. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने बलाढ्य नेतृत्व उदयाला आले.
मुलायम सिंह यादव राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले. ते समाजवादी पार्टीचे केवळ एक खासदार म्हणून लोकसभेत बसू लागले. 2019 मध्ये लोकसभा मुदत पूर्ण करून विसर्जित होताना मुलायम सिंह यांनी अखेरचे भाषण केले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती.
त्यानंतर त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह समाजवादी पार्टीच्या मार्गदर्शक मंडळात टाकून दिले. त्यांच्या निधनानंतर अखिलेश यादव यांनी मुलायम सिंहांची सैफई मध्ये समाधी बांधली. आता त्या समाधीभोवतीच मुलायम सिंहांचे मोठे स्मारक उभे राहत आहे. सुमारे 8.3 एकर परिसरावर उभे राहत असलेल्या या स्मारकावर 80 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्या स्मारकाचे भूमिपूजन अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात केले.
Bhoomipujan of Mulayam Singh’s memorial with Vedic chants
महत्वाच्या बातम्या
- डीपफेक’ व्हिडीओवर सरकारने बोलावली उच्चस्तरीय बैठक
- राहुल गांधी गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे समस्त भारतीयांना माहिती नव्हते, ते कालच समजले!!
- ED फुल्ल स्विंग मध्ये, नॅशनल हेराल्ड पाठोपाठ BYJU’S वर कारवाई; 9362.35 कोटी रुपयांसंदर्भात नोटीस!!
- नॅशनल हेरॉल्ड केस मध्ये ED चा गांधी परिवाराला जबरदस्त दणका; तब्बल 751.9 कोटींची मालमत्ता जप्त!!
- निवडणूक असलेल्या 5 राज्यांतून 1760 कोटी रुपयांची दारू आणि रोख जप्त; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त