• Download App
    भोलेनाथच्या भक्तांनी रचला इतिहास, १८ दिवसांत ५ लाख लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचले Bholenaths devotees created history 5 lakh people reached Kedarnath Dham in 18 days

    भोलेनाथच्या भक्तांनी रचला इतिहास, १८ दिवसांत ५ लाख लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचले

    अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १० मे रोजी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले होते. Bholenaths devotees created history 5 lakh people reached Kedarnath Dham in 18 days

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केदारनाथ धामच्या यात्रेने 2024 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केदारनाथ यात्रेच्या इतिहासात प्रथमच १८ दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी दर्शन घेतले आहे. बाबा केदारनाथ येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी पोहोचत आहेत.

    केदार व्हॅली ते केदारनाथ हा संपूर्ण मार्ग यात्रेकरूंनी भरलेला आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त भाविक बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी चारधामला पोहोचत आहेत. यंदा केदारनाथमध्ये यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. अवघ्या 18 दिवसांत 5 लाखांहून अधिक भाविकांनी बाबा केदार यांचे दर्शन घेतले.



    बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी सुरुवातीपासून दररोज ३० हजारांहून अधिक लोक येत आहेत. प्रशासनाकडून प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. केदारधाममध्ये यात्रेकरूंना राहण्याची व जेवणाची सोय, शौचालये आणि वीज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय संपूर्ण संकुल तसेच प्रत्येक हेलिपॅड, पदपथ, प्रवासी थांबे आणि महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

    अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १० मे रोजी केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले होते. दरवाजे उघडल्यानंतर संपूर्ण केदारनाथ ‘बम-बम भोले’ आणि ‘बाबा केदारनाथ की जय’च्या घोषणांनी दुमदुमत आहे. भक्तीभावात तल्लीन झालेल्या परिसरात दररोज भाविक डमरू घेऊन नाचताना दिसतात. दरवाजे उघडताना मंदिराला 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. दरवाजे उघडताना हेलिकॉप्टरमधून यात्रेकरूंवर फुलांचा वर्षावही करण्यात आला. यावेळी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी भाविकांचे अभिनंदन करताना सांगितले होते की, यावेळी चारधाम यात्रा एक नवा विक्रम करेल आणि नेमके तसेच घडले.

    Bholenaths devotees created history 5 lakh people reached Kedarnath Dham in 18 days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार