विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील निवडणूक एका बाजुला रस्त्यावर, सोशल मीडियावर लढली जात असताना आता गाण्यातूनही वॉण भडकले आहे. खासदार रवी किशन यांनी योगी सरकारची कामगिरी एका भोजपुरी गाण्यातून मांडली होती. आता एका भोजपुरी गायिकेने त्यांना उत्तर दिले आहे.Bhojpuri singer responds to Ravi Kishan’s song ‘Song War’ in Uttar Pradesh election
यूपी में सब बा असे म्हणणाºया रवी किशन यांना यूपी में का बा असे विचारले आहे.नुकतेच खासदार रवी किशन यांचे एक भोजपुरी गाणे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. यूपी में सब बा असं या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात त्यांनी योगी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली आहे.
भोजपुरी गायिका नेहा सिंग राठोड हिने स्वत: यूपी में का बा? हे गाणं लिहून सादर केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून तिने योगी सरकारवर टीकास्त्र सोडले असून या गाण्यात उत्तर प्रदेशातील करोना काळातील गैरव्यवस्थापन, लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि भाजपाच्या मंदिर राजकारणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून विरोधी पक्षातील नेत्यांनी हे गाणे चांगलेच व्हायरल केले आहे.नेहा ही भोजपुरी भाषेमध्ये गाणी लिहिते आणि सादर करते. धरोहर नावाचे तिचे युट्यूब चॅनेल आहे. २०२०मध्ये भाजपाने बिहार निवडणुकीसाठी बिहार मे का बा नावाचं गाणं तयार केलं होतं.
यामध्ये बिहारमधील परिस्थिती सुधारली असून बराच विकास झाला आहे असा प्रचार भाजपाने केला होता. तिने बिहारमध्ये काय आहे हे सांगणारं ला सुना जवाब का बा बिहार में? हे गाणं स्वत: लिहिलं आणि खास बिहारमधील लोककलाकारांप्रमाणे सादर केले होते.
Bhojpuri singer responds to Ravi Kishan’s song ‘Song War’ in Uttar Pradesh election
महत्त्वाच्या बातम्या
- हौथी बंडखोरांकडून अबूधाबी विमानतळाजवळ ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट, दोन भारतीयांसह तीन जण ठार
- पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलली; १४ ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान
- यूएई मधील विमानतळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले तीन मोठे स्फोट; मृतांमध्ये दोन भारतीय एक पाकिस्तानी
- मोठी घोषणा : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून, 15 ते18 वयोगटाचे लसीकरणही लवकरच पूर्ण होणार