• Download App
    भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनची जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका Bhima Koregaon accused Rona Wilson seeks bail in NIA special court

    भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनची जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेल्या रोना विल्सनने अंतरिम जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका दाखल केली आहे. वडिलांच्या निधनानंतर ३० दिवसांनी कुटुंबीयांनी आयोजित केल्या शोकसभेला उपस्थित राहण्याासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. Bhima Koregaon accused Rona Wilson seeks bail in NIA special court

    यासाठी रोना विल्सनने वकील आर सत्यनारायण आणि नीरज यादव यांच्या माध्यमातून बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. रोना विल्सनच्या अर्जानंतर विशेष न्यायाधीस डी ई कोथळीकर यांनी एएनआयला म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. तसेच या अर्जावर पुढील सुनावणी ६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.



    १६ सप्टेंबरला शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी विल्सनने १३ सप्टेंबरपासून दोन आठवड्यांचा जामीन द्यावा, असं अर्ज केला आहे. मानवी मूल्यांचा विचार करून जामीनासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची आणि शोकसभेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.

    रोना विल्सनला जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणात कथित सहभागाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईतील तलोजा तुरुंगात आहे. रोना विल्सनच्या वडिलांचं निधन १८ ऑगस्ट २०२१ रोजी केरळमध्ये झालं होतं. रितीनुसार त्याच्यांवर १९ ऑगस्टला अंत्यविधी पार पडला होता.

    Bhima Koregaon accused Rona Wilson seeks bail in NIA special court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे