विशेष प्रतिनिधी
इंदूर : आत्महत्या केलेले अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांचे १२ महिलांशी संबंध होते. त्यातील दोघी आयएएस अधिकारी होत्या, असे पोलीस तपासात समोर आले आहे. ड्रायव्हरला इंग्रजी येत नसेल असे समजून या मुलींशी भय्यू महाराज इंग्रजीत बोलायचे. पण त्याला थोडेफार इंग्रजी येत होते.Bhayyu Maharaj had relations with 12 girls, two of whom were IAS officers
भय्यू महाराज यांचे ड्रायव्हर कैलास पाटील याने भय्यूजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला. महाराज गाडीत बसून कायम मुलींशी संवाद साधायचे. त्यांचे बोलणं इंग्रजीत व्हायचे. महाराजांना वाटायचे पाटीलला इंग्रजी कळत नाही परंतु त्यांच्यासोबत राहून मला थोडीफार इंग्रजी येत होती.
पाटील यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा महाराजांचे १२ मुलींसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्यातील दोन आयएएस अधिकारी होत्या. मुख्य सेवादार विनायक, शरद यांना ही कल्पना होती. याच माहितीच्या आधारे भय्यूजी महाराज यांच्या जवळच्या सहकाºयांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. त्यामुळे भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
भय्यू महाराज यांच्या जवळचे वकील निवेश बडजात्या यांना 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा फोन कॉल आला होता. धमकावणाऱ्याने स्वत:ला भय्यू महाराज यांचा माजी ड्रायव्हर कैलास पाटील असे सांगितले. पोलिसांनी त्यालाच पकडून कसून चौकशी केली. तेव्हा भय्यू महाराज यांचा सेवक विनायक, शरद आणि शीष्या पलक ही तीन नावे समोर आली.
कैलासने आपल्या कबुली जबाबात म्हटले होते की त्याने अनेकवेळा भय्यू महाराज यांची कार घेऊन पलकला तिच्या घरातून आश्रम आणि आश्रमवरून घरी सोडले होते. पलक या प्रवासादरम्यान विनायक आणि शरद यांच्याशी बोलत राहायची. कैलास हेच संभाषण नेहमी कान लावून नीटपणे ऐकायचा.
यानंतरच पोलिसांनी आरोपी शरद, विनायक आणि यांचा संबंध भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाशी जोडला. तसेच सर्वांचे जबाब नोंदवले. हे तिघे आरोपी मिळून महाराजांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होते. पोलिसांच्या तपासात ही गोष्ट देखील समोर आली होती की भय्यू महाराज यांचे 12 तरुणींशी संबंध होते.
विशेष त्यातील दोन महिला आयएएस अधिकारी होत्या.भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात दोन महिन्यांत पोलिसांना काहीच सुगावा लागला नव्हता. त्यामुळेच 2 महिन्यांत केस गुंडाळण्याची तयारी असतानाही पोलिसांनी 6 महिन्यांत तपासाची पूर्ण दिशा बदलली आणि भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा छळा लावला.
भय्यू महाराज सुसाइड केसमध्ये पोलिसांनी सुरुवातीला 20 जणांची चौकशी केली. कुटुंबातील लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भय्यू महाराज यांना 22 वर्षांपासून ओळखणारे वकील निवेश बडजात्या यांना एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला.
समोरील व्यक्तीने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. कैलास पाटील याला महाराजांनी हयातीत असतानाच नोकरीवरून काढून टाकले होते. वकिलाकडे खूप पैसा आहे, धमकावल्यास तो सहज देईल असे त्याला वाटले होते. परंतु, त्याच्या याच कॉलमुळे भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागले आणि विनायक, शरद आणि पलक या मुख्य आरोपींची नावे समोर आली.
कैलासने पोलिसांना सांगितले होते की तो 2004 पासून भय्यू महाराज यांच्या कारचा चालक होता. कमी शिकलेला असल्यामुळे त्याला इंग्रजी येत नव्हती. परंतु, महाराजांसोबत राहत असताना त्याला इंग्रजी भाषा कळायला लागली होती. महाराज त्याच्यासमोरच कारमध्ये तरुणींशी गप्पा-गोष्टी करायचे. त्यांना वाटायचे की याला इंग्रजी कळत नाही.
सोनिया, पलक, शालिनी आणि मल्लिकासह एकूणच 12 तरुणींशी भय्यू महाराज यांचे संबंध होते. त्यातल्या दोन महिला तर आयएएस अधिकारी होत्या. विनायक आणि शेखर यांना देखील त्या सर्वांची माहिती होती. त्या दोघांनाच तरुणींचे फोन येत होते. ड्रायव्हरला कळाले होते की ते दोघे मिळून भय्यू महाराज यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याच्या प्रयत्नात होते.
कैलासने सांगितल्याप्रमाणे, त्याला अचानक 6 महिन्यांसाठी भय्यू महाराज यांची मुलगी कुहू हिच्याकडे पुण्यात पाठवून देण्यात आले. त्यामुळे, तो आश्रमापासून दूर झाला. ब्लॅकमेल करणारी तरुणी (पलक) महाराजांचा विश्वासू मनमीतच्या घरासमोर राहत होती. मनमीतनेच पलकची आणि विनायक, शेखर यांची भेट करून दिली होती. तेव्हापासून ती आश्रमात येत होती आणि कामकाज पाहायला सुरुवात केली होती. कैलासने हा जबाब डिसेंबर 2018 मध्ये दिला होता.
Bhayyu Maharaj had relations with 12 girls, two of whom were IAS officers
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : राज्यसभेच्या सदस्यांसाठी आचारसंहिता जाहीर, कामकाज सुरळीत चालण्यासाठी लागू होणार हे नियम, वाचा सविस्तर…
- पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!
- टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या सूचना : प्रीपेड मोबाइल ग्राहकांना रिचार्जची वैधता २८ ऐवजी ३० दिवस द्यावी लागेल
- राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी