Bhawanipur By-polls :पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराचे लोण अजून शमलेले नाही. पोटनिवडणुकीपूर्वीच हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढले आणि कारकडे नेले. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांचा भाऊही मारहाणीत सहभागी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. Bhawanipur By-polls BJP Vice President Dilip Ghosh Attacked By TMC Party Workers in Bhawanipur
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराचे लोण अजून शमलेले नाही. पोटनिवडणुकीपूर्वीच हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढले आणि कारकडे नेले. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांचा भाऊही मारहाणीत सहभागी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
दिलीप घोष म्हणाले की, सोमवारी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते आणि खासदार अर्जुन सिंह हे भाजप उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या प्रचारासाठी भवानीपूरला पोहोचले होते. ते जदुबाबूर बाजारातील लसीकरण शिबिरात पोहोचले होते. यादरम्यान टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना मारहाण केली आणि अर्जुन सिंह यांच्या विरोधात ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. प्रियांका टिबरेवाल या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. टीएमसीने आरोप केला की, दिलीप घोष यांच्या अंगरक्षकाने जमावाला घाबरवण्यासाठी पिस्तुलाचा वापर केला.
बंगालमध्ये 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक
दिलीप घोष म्हणाले की, टीएमसीने विनाकारण हल्ला केला आणि मारहाण केली आणि एका भाजप कार्यकर्त्याला जखमी केले. बंगालमधील 3 विधानसभा जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्याला मागितला अहवाल
निवडणूक आयोगाने याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे. बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेनंतर निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. शुभेंदू म्हणाले की, परिस्थिती खूप वाईट आहे. आमच्या पक्षाची एक टीम दिल्लीत ECI ला भेटली आहे, पण आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
Bhawanipur By-polls BJP Vice President Dilip Ghosh Attacked By TMC Party Workers in Bhawanipur
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली
- पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला, ग्वादरमध्ये बलुच बंडखोरांचे कृत्य
- ‘भारत बंदची हाक देणाऱ्या संघटना तालिबानी’, बीकेयू – भानुच्या अध्यक्षांचे वक्तव्य, राकेश टिकैतांवरही डागली तोफ