विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रयागराज मध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्याची पॉप्युलरिटी सगळ्यात जगभरात पोहोचल्यानंतर तिथल्या व्यवस्थेची देखील सगळीकडे वाखाणणी झाली. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे सगळीकडे नाव झाले. त्या नावाच्या प्रभावातून अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी देखील सुटली नाही. महाकुंभाच्या पॉप्युलरिटीत आपलाही हात मारून घेण्याची संधी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला सोडता आली नाही. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी वरून अखिलेश यादव यांनी आणि त्यांच्या खासदारांनी लोकसभेत जरी गोंधळ घातला, तरी महाकुंभाच्या पॉप्युलरिटीचा वापर समाजवादी पार्टीने जाहिरातीच्या रूपात करून घेतला.
समाजवादी पार्टीच्या कार्यालयाबाहेर अखिलेश यादव त्रिवेणी संगमात स्नान करत असल्याचा फोटो छापून 27 मध्ये येणार अखिलेश 32 मध्ये भरवणार अर्धकुंभ, अशी पोस्टर्स लावून त्यांच्या समर्थकांनी मोठी जाहिरातबाजी केली. त्यामुळे एरवी मुस्लिम तुष्णीकरणात मग्न असलेली समाजवादी पार्टी एकदम हिंदूवादी बनल्याचे चित्र दिसले. पण म्हणून अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात भरलेल्या महाकुंभाच्या व्यवस्थेची चर्चा विसरली गेली नाही.
अखिलेश यादव यांच्या सत्ताकाळात 2013 मध्ये प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा भरला होता. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांनी कुठल्या हिंदू मंत्र्याला कुंभमेळा विशेष मंत्री बनवले नव्हते, तर आजम खान यांच्याकडे कुंभमेळा मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरच चेंगराचेंगरी झाली होती. त्या कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावेळी अजून खान यांना कुंभमेळा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळेच आता समाजवादी पार्टीच्या कार्यालयाबाहेर जरी 27 मध्ये येणार अखिलेश, 32 मध्ये भरवणार अर्धकुंभ, अशी जाहिरातबाजी त्यांच्या समर्थकांनी केली असली, तरी त्या अर्धकुंभाचे व्यवस्थापन अखिलेश यादव हे कुठल्या हिंदू मंत्र्याकडे सोपवणार की कोणत्या नव्या आजम खान यांच्याकडे सोपवणार??, याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
bhavya Ardhkumbh karayenge vishesh’ put up outside Samajwadi Party office in Lucknow
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi दिल्लीत आज मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात!!
- US : अमेरिकेने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांविरुद्ध कारवाई केली सुरू
- Fatehpur : फतेहपूरमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; इंजिन रुळावरून घसरले
- राजीव गांधींच्या 21 व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली; मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!