विशेष प्रतिनिधी
नाशिक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील ८ व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. Bhavartha Ramayana in front of Prime Minister Modi at Kalaram Temple
श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान श्री. मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
Bhavartha Ramayana in front of Prime Minister Modi at Kalaram Temple
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!