प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळल्यानंतर फिरोजपुरचा दौरा रद्द पर्यंत करून ते दिल्लीला परत आले. त्यानंतर #BhartstandwithModiji हा हॅशटॅग ट्विटरवर जबरदस्त ट्रेंङ झाला असून गेल्या चार तासांपासून भारतामध्ये येतो टॉप वर आहे. #काँग्रेस ही कलंक है हा हॅशटॅग देखील ट्विटर वर जोरात ट्रेंङ होताना दिसतो आहे.BhartstandwithModiji Strong trend on Twitter
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड राजकीय भांडण जुंपले आहे. दोन्ही बाजू अक्षरशः एकमेकांवर तुटून पडल्या आहेत. काँग्रेसचा खूनी मनसुबा पंजाबमध्ये मध्ये प्रत्यक्षात उतरू शकला नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे, तर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधानांच्या फिरोजपुर रॅलीकङे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. 70000 खुर्च्या मांडल्या होत्या पण 700 लोक सुद्धा रॅलीमध्ये हजर नव्हते. त्यामुळे पंतप्रधानांनी दौरा रद्द केला, अशी टीका काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवर केली आहे. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी देखील पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे.
पण ट्विटर वर भारतातली जनता पंतप्रधानांबरोबर असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर #काँग्रेस ही कलंक है हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या ट्विटर हँडलवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याबद्दल चकार शब्दही लिहिण्यात आलेला नाही. गांधी परिवारातील दोन पंतप्रधान सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी मुळे त्यांना आणि भारताला गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गांधी परिवाराने विद्यमान पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी बाबत चकार शब्दही काढू नये ही बाब राजकीय दृष्ट्या आश्चर्याची आणि गंभीर मानली पाहिजे.