• Download App
    डॉक्टरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, केजरीवाल यांची अभिनव मागणी|Bharatratna awrd should be given to doctors

    डॉक्टरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, केजरीवाल यांची अभिनव मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोना काळात अथकपणे रुग्ण व लोकसेवा करणारे डॉक्टर, परिचारिका आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांना यंदा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.Bharatratna awrd should be given to doctors

    वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मारन करण्यासाठी नियमात बदल करणे आवश्यकक असेल, ते केले जावेत. डॉक्टरांना हा सन्मान दिल्यास प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असेही ते पत्रात म्हणतात.
    या जागतिक साथीत ज्या डॉक्टरांनी त्यांचे जीव गमावले आहेत,



    त्यांना ही आदरांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान असून तो डॉक्टर, परिचारिका आणि निमआरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यास त्यांचा तो खरा सन्मान ठरेल. त्यांचे आभार मानण्यासाठी ‘भारतरत्न’शिवाय अन्य कोणताही दुसरा मार्ग असू शकत नाही, असे केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे.

    Bharatratna awrd should be given to doctors

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- कावडियांच्या वेशात बदमाश लपलेत, त्यांचा पर्दाफाश करू