• Download App
    Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait meets West Bengal CM Mamata Banerjee on issues related to agriculture and local farmers

    शेतकरी आंदोलनाचे नेते ममतांच्या वळचणीला; हवा गेलेल्या आंदोलनाला नवा पंप मारायला…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी आंदोलनाला आज ५०० दिवस पूर्ण होताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले. पण त्याकडे दुर्लक्ष करून शेतकरी आंदोलनाचे नेते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वळचणीला गेल्याचे दिसले. Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait meets West Bengal CM Mamata Banerjee on issues related to agriculture and local farmers

    शेतकरी आंदोलनाचे एक नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी ममतांसमवेत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि बंगाल निवडणूकीपूर्वी तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील झालेले नेते यशवंत सिन्हा उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कायदे म्हणून ममता बॅनर्जींनी त्यांना विरोध केला होताच. आज त्याचा त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांसमोर पुनरूच्चार केला.



    शेतकरी आंदोलक नेत्यांनी ममतांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. बंगाल हे शेतकऱ्यांसाठी मॉडेल स्टेट बनविण्याचे आश्वासन ममतांनी दिल्याचे राकेश टिकैत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    -नवा नेता मिळाला

    कोरोना काळ आणि भरपूर दिवस झाल्याने शेतकरी आंदोलन भरकटले आणि थंडावले होते. पण ममतांच्या रूपाने आंदोलनाला नवा नेता मिळाला आहे. जो सत्तेवर आहे आणि पंतप्रधान मोदींचा खमका विरोधक आहे. राकेश टिकैत आणि त्यांच्या सहकार्यांनी बंगलामध्ये जाऊन ममतांचा प्रचार देखील केला होता. त्यामुळे ममतांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला नवी झळाळी देण्याचा शेतकरी नेत्यांचा प्रयत्न आहे.

    तसेही ममता बॅनर्जी या बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर उत्साहात आहेत. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा बंगालबाहेर देखील उफाळून आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात तृणमूळ काँग्रेस निवडणूक लढविण्याच्या बेतात आहे. त्यासाठी पक्षाचे नाव अखिल भारतीय करण्यापासून विविध नेत्यांना गळाला लावण्यापर्यंतचे प्रयोग करण्यात येणार आहेत.

    मायावतींचे एकेकाळचे रणनीतीकार सतीशचंद्र मिश्रा हे ममतांना येऊन मिळण्याच्या बेतात असल्याचीही चर्चा आहे. त्यातच ज्यांचे नाव उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी चर्चेत असते, ते राकेश टिकैत यांनीही ममतांची भेट घेतली आहे. त्यामुळे ममतांची महत्त्वाकांक्षा आणि केंद्रीय पातळीवर नवीन मोदी विरोधी नेत्याचा शोध हे समीकरण जूळविण्याचे प्रयत्नांना जोर आला आहे. राकेश टिकैत यांनी ममतांची भेट घेण्याला हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे.

    Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait meets West Bengal CM Mamata Banerjee on issues related to agriculture and local farmers

    Related posts

    Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

    Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

    Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी