• Download App
    BRS : विरोधी ऐक्याची उपराटी तऱ्हा; भाजपला आव्हान देत काँग्रेस - राष्ट्रवादीच फोडा!!Bharat Rashtra Samiti enters maharashtra by splitting NCP and Congress

    BRS : विरोधी ऐक्याची उपराटी तऱ्हा; भाजपला आव्हान देत काँग्रेस – राष्ट्रवादीच फोडा!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : विरोधी ऐक्याची उपराटी तऱ्हा भाजपला आव्हान देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच फोडा, असे चित्र आज महाराष्ट्र दिसते आहे. तेलंगण मधील भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या तिसऱ्या दौऱ्यावर येत आहेत आणि नागपूर मध्ये ते पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय उघडत आहेत. पण त्यांची सगळी राजकीय खेळी भाजपला आव्हान देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना फोडण्याची राहिली आहे. Bharat Rashtra Samiti enters maharashtra by splitting NCP and Congress

    महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये चंद्रशेखर राव यांच्या मोठमोठ्या पोस्टर्स त्यांच्या पक्षाच्या बड्या बड्या जाहिराती लागल्या आहेत. कांद्याला सध्या असलेला असलेल्या भावापेक्षा दुप्पट कांदा खरेदीची लालूच त्यांनी शेतकऱ्यांना दाखवली आहे. आपले सरकार हे शेतकऱ्यांचे असेल असे त्यांनी जाहीर केले आहे.

    चंद्रशेखर राव यांच्या आत्तापर्यंतच्या नांदेड आणि सोलापूर दौऱ्यात तिथल्या स्थानिक काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, माजी आमदार, खासदारांनी त्यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. भाजप किंवा शिवसेनेचा क्वचित एखादा छोटा मोठा कार्यकर्ता त्यांच्या गळाला लागू शकला आहे. पण विद्यमान आमदार तर सोडाच पण भाजप – शिवसेनेचे माजी आमदार देखील चंद्रशेखर राव यांच्या गळाला लागलेले नाहीत. त्या उलट शंकर अण्णा धोंडगे यांच्यापासून ते घनश्याम शेलार यांच्यापर्यंत राष्ट्रवादीचे पहिल्या दुसऱ्या फळीतले नेते राष्ट्रवादीतून फुटून चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत गेले आहेत. आजही त्यांच्या नागपूर दौऱ्यात काँग्रेस राष्ट्रवादीचेच माजी आमदार, खासदार भारत राष्ट्रसभेतील प्रवेश करणार आहेत.

    वास्तविक याच चंद्रशेखर राव यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना मुंबईत येऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोघांबरोबर पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी विरोधी ऐक्याचे रणशिंग फुंकले होते. आजही त्यांचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण त्या प्रयत्नांना वेगळा फाटा फुटला आहे. आणि तो फाटा म्हणजे भाजपला आव्हान द्यायचे आणि प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते फोडायचे, असा आहे. नांदेडमध्ये हे घडले आहे. नागपुरात त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.

    चंद्रशेखर राव यांची राजकीय खेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी उघडून दाखवली आहे चंद्रशेखर राव यांनी 3.5 लाख रुपये पॅकेजच्या एका व्यक्तीला पक्ष विस्तारासाठी असाइनमेंट दिली आहे आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार यांना फोडण्याचे काम करत आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

    Bharat Rashtra Samiti enters maharashtra by splitting NCP and Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती