नवी दिल्ली : संविधानातून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरच्या निमंत्रण पत्रात ‘ The President of India’ ऐवजी ‘The President of BHARAT” लिहिले आहे. G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानीत आयोजित केली जाणार आहे. Bharat instead of INDIA’in G 20 invitation letter Chief Minister Sarmas tweet sparks discussions
‘India’ हा शब्द काढून टाकण्याच्या चर्चेदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘भारत प्रजासत्ताक’ (REPUBLIC OF BHARAT) असे ट्विट केले. ते म्हणाले की आमची सभ्यता धैर्याने अमृतकाळाकडे वाटचाल करत आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर लिहिले की, ‘तर ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरसाठी नेहमीच्या ‘The President of India ऐवजी ‘The President of BHARAT’ यांच्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. आता, राज्यघटनेत कलम 1 असू शकते: ‘भारत, जो India होता, तो राज्यांचा संघ असेल.’ पण आता या ‘युनियन ऑफ स्टेट्स’वरही हल्ला होत आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना ‘इंडिया’ या शब्दाऐवजी देशाला ‘भारत’ म्हणावे असे आवाहन केले आहे. सरसंघचालकांना यासाठी पुरातनकालाचा दाखला दिला असून, भारत हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले आहे, ते पुढेही चालू ठेवावे, असे म्हटले आहे.