पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित
विशेष प्रतिनिधी
जयपूर : भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपूरच्या अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयपूरमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.Bhajanlal Sharma took oath as Chief Minister of Rajasthan
भजनलाल शर्मा यांच्याबरोबरच दिया कुमारी सिंह आणि प्रेमचंद बैरवा यांनीही शपथ घेतली. दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक जिंकून भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून भविष्यातील राजकारणाची तयारी करण्याचे काम भाजपने केले आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत.
मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. दिया कुमारी सिंह आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. तर वासुदेव देवनानी यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून दिया कुमारी विजयी झाल्या आहेत. तर प्रेमचंद बैरवा जयपूर जिल्ह्यातील दुडू मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
Bhajanlal Sharma took oath as Chief Minister of Rajasthan
महत्वाच्या बातम्या
- 6 मोबाइल फोन, URL आणि बँक अकाउंटवरून उलगडणार संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचे रहस्य
- Stock Market : शेअर बाजारात झंझावाती तेजी, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स 71,000 च्या जवळ
- मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना वेगळ आरक्षण द्या, पण झुंडशाही थांबवा; भुजबळांनी सुनावले
- RBI Action: RBIची पाच सहकारी बँकांवर कारवाई, लाखोंचा दंडही ठोठावला