विशेष प्रतिनिधी
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वांना तिसरा चकवा; राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा!!, असे म्हणायची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री बदलायच्या निर्णयावरून आली आहे. Bhajanlal Sharma new chief minister of Rajastan
प्रसार माध्यमांनी ज्यांची नावे बिलकुलच मुख्यमंत्रीपदाच्या रेस मध्ये चालवली नव्हती, ज्या नावांची प्रसार माध्यमांना साधी भनकही लागली नव्हती, अशाच नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी नेमले आहे. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय, मध्य प्रदेशात मोहन यादव यांना मुख्यमंत्री नेमल्यानंतर राजस्थानातही असाच धक्कादायक बदल होणार अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या होत्या त्यानुसारच भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.
पण त्याआधी राजस्थानात वसुंधरा राजे जाणार आणि त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री येणार याच्या अटकळी भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि माध्यमांनी आधीच बांधून ठेवल्या होत्या. पण अधून मधून वसुंधरा राजे यांचे भाजप नेतृत्वाला आव्हान, भाजप नेतृत्वाची त्यांना ऑफर वगैरे बातम्या माध्यमे चालवत होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वसुंधरा राजेंना विधानसभा अध्यक्ष पदाची ऑफर दिली, पण त्यांनी ती नाकारली आणि आपल्याला एक वर्षासाठी मुख्यमंत्री करा अशी प्रति भऑफर दिली अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. त्या बातम्या खोट्या ठरल्या.
त्या ऐवजी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा चकवा देत पंतप्रधान मोदींनी आपले वजन भजनलाल शर्मा या नवख्या नेत्याच्या पारड्यात टाकले आणि त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. उद्या 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता भजनलाल शर्मा या नव्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.