• Download App
    सावधान, ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये गाठणार शिखर|Beware, the third wave of corona will come in August, the peak will reach in October

    सावधान, ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये गाठणार शिखर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केरळचा अपवाद वगळता संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, ऑ गस्ट महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लाट शिखरावर असेल असेही अहवालात म्हटले आहे.Beware, the third wave of corona will come in August, the peak will reach in October

    हैदराबाद आणि कानपूर येथील आयआयटीतील मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधन अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच देशात कोरोनाच्या तिसºया लाटेला सुरुवात होणार आहे.



    या लाटेमध्ये दिवसाला एका लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. परिस्थिती चिंताजनक झाली तर दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची भीती आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्या उच्चांक गाठू शकेल

    तिसºया लाटेमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्र आणि केरळमध्ये होण्याची भीती आहे. याठिकाणची परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणे घातक नसेल,असे या अहवालात म्हटले आहे.

    देशातील महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजुला उत्तर प्रदेशासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाची लाट थोपविण्यात यश मिळविले आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्याचबरोबर सक्रीय रुग्णांची संख्या दोन आकडी झाली आहे.

    रविवारी भारतामध्ये करोनाचे 41,831 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 541 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील राज्यांसहीत 10 राज्यांना जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

    Beware, the third wave of corona will come in August, the peak will reach in October

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य