वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताकडे वाकड्या नजरेने पहाल तर सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी तालिबानी दहशतवाद्यांना दिला आहे. भविष्यात अफगाणिस्तानमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देण्याची तयारी लष्कराने केली असल्याचं ते म्हणाले. Beware if you look at India with a crooked eye; Chief of Defense Staff General Bipin Rawat warned Taliban militants
रावत म्हणाले की, अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानचे रुप हे २० वर्षापूर्वी जे होतं तेच आताही आहे. त्यामुळे त्या वेळेप्रमाणेच आताही भारतात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी केली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्कराची योजना तयार आहे.
ते पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं. पण ते जलदगतीने हालचाल करतील आणि सत्ता हातात घेतील असे वाटले नव्हते.
आताची तालिबान ही २० वर्षापूर्वीची असून फक्त त्याचे सहकारी बदलले आहेत. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. या आधी १९८९ च्या दरम्यान रशिया हा अफगाणिस्तानमधून पराभूत होऊन परतला होता, त्यानंतर तालिबानी दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. पाकिस्ताननेही भारतात दहशतवादी कारवाया वाढवल्या होत्या.
Beware if you look at India with a crooked eye; Chief of Defense Staff General Bipin Rawat warned Taliban militants
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : आपला मेंदू हा जीवनातील अनेक भल्याबुऱ्या आठवणींचा खजिना
- विज्ञानाची गुपिते : व्यायाम सकाळीच का करावा; यामागेही आहे शास्त्रीय कारण
- पाण्याची बाटली ३ हजारांची तर ताटभर भात ७ हजार रुपयांना, अफगाणिस्तानातील चित्र; तालिबानमुळे विमानतळावर नागरिकांचे हाल
- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा RTPCR अहवाल हवाच; लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मात्र बंधन नाही