विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट आमदार हा पुरस्कार यंदा चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना मिळाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.Best MLA Award to MLA Shweta Mahale
सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन_रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मी विनम्रतेने माज्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने या सन्मानाचा स्वीकार केला, असे आमदार महाले यांनी म्हटले. अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला होता.
सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्डस अँड लीडरशिप समिट 2022 चे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रदीप भारद्वाज यांनी पुरस्काराविषयी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद आहे.
हा नागरिकांचा सन्मान हा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते, असेही श्वेता महाले यांनी म्हटले.या अवॉर्डनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं असून भाजपच्या महिला नारी शक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे म्हटले आहे.
Best MLA Award to MLA Shweta Mahale
महत्त्वाच्या बातम्या
- AATMANIRBHAR BHARAT : संरक्षण क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर ! मोदी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’
- Hijab Supreme Court : हिजाब बंदीवर कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात होळीच्या सुट्टीनं
- The Kashmir Files : किसे मिरची लगी तो मैं क्या करू!!; फडणवीसांनी टोचले राऊतांना!!
- आमदारांचा स्थानिक विकासनिधी पाच कोटी अजित पवार यांची घोषणा