वृत्तसंस्था
कटक : Bengaluru-Kamakhya रविवारी ओडिशातील कटक येथे बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस (१२५५१) चे अकरा एसी डबे रुळावरून घसरले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. घटनास्थळी वैद्यकीय आणि आपत्कालीन पथके पाठवण्यात आली आहेत.Bengaluru-Kamakhya
सकाळी ११:५४ वाजता नेरगुंडी स्टेशनजवळ हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातामुळे तीन गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अडकलेल्या प्रवाशांना कामाख्याला घेऊन जाणारी विशेष ट्रेन दुपारी ४:१० वाजता घटनास्थळी पोहोचली.
यापूर्वी, पूर्व किनारपट्टी रेल्वेचे पीआरओ अशोक मिश्रा यांनी सांगितले होते की, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तथापि, वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या दृश्यांमध्ये एका जखमी व्यक्तीला स्ट्रेचरवर नेले जात असल्याचे दिसून आले.
२२ जानेवारी रोजी पुष्पक एक्सप्रेसला अपघात झाला
२२ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील २३ प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. घटनेदरम्यान ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, आगीची अफवा प्रथम एका चहा विक्रेत्याने पसरवली होती.