• Download App
    मन सुन्न करणारा व्हिडिओ, मृत्यूपूर्वी भाजप कार्यकर्त्याने दोन वेळा केले फेसबुक लाइव्ह, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य । Bengal Violence Heart-wrenching video, BJP activist did Facebook Live twice before death, says Trinamool goons cruelty

    मन सुन्न करणारा व्हिडिओ, हत्येपूर्वी भाजप कार्यकर्त्याने 2 वेळा केले फेसबुक लाइव्ह, सांगितले तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य

    Bengal Violence : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय सुनिश्चित होताच राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. निकालाच्या दिवशी भाजप उमेदवारांवर हल्ले झाले, याशिवाय पक्ष कार्यालयालाही जाळण्यात आले. एका कार्यकर्त्याचीही हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी रविवारी (2 मे) अभिजीत सरकार नावाच्या या भाजप कार्यकर्त्याने तृणमूलच्या गुंडांच्या क्रौर्याबद्दल सांगितले. अभिजीतच्या फेसबुक लाइव्हनंतर काही वेळातच त्याची हत्या करण्यात आली. Bengal Violence Heart-wrenching video, BJP activist did Facebook Live twice before death, says Trinamool goons cruelty


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय सुनिश्चित होताच राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले. निकालाच्या दिवशी भाजप उमेदवारांवर हल्ले झाले, याशिवाय पक्ष कार्यालयालाही जाळण्यात आले. एका कार्यकर्त्याचीही हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी रविवारी (2 मे) अभिजीत सरकार नावाच्या या भाजप कार्यकर्त्याने तृणमूलच्या गुंडांच्या क्रौर्याबद्दल सांगितले. अभिजीतच्या फेसबुक लाइव्हनंतर काही वेळातच त्याची हत्या करण्यात आली.

    अभिजीत सरकारने फेसबुकवर लाइव्ह केले होते. त्याला फेसबुकवर लाइव्ह कसे येतात हेदेखील माहिती नव्हते, परंतु हिंसेदरम्यान त्याने कसाबसा हा व्हिडिओ बनवला. टीएमसीचे गुंड सातत्याने बॉम्बस्फोट करत असल्याचे तो म्हणाला. तृणमूलच्या लोकांनी आपले घर आणि कार्यालय उद्ध्वस्त केल्याचेही तो म्हणाला. अभिजीत लाइव्हमध्ये म्हणााला की, त्याची एकमेव चूक म्हणजे तो भाजप कार्यकर्ता आहे. म्हणून हे तृणमूलचे लोक हल्ला करत आहेत.

    अभिजीतने अनेक निराधार श्वान पाळले होते. त्यापैकी एका मादी श्वानाने नुकतीच काही पिल्ले जन्माला घातली होती. अभिजीत सरकार या श्वानाकडे लक्ष वेधून म्हणाला की, गुंडांनी या पिल्लांनाही सोडले नाही. सर्वांना ठार मारले. अभिजीतने रडत रडतच तृणमूलच्या गुंडांचे क्रौर्य सांगितले. दुसर्‍या व्हिडिओत त्याने म्हटले की, माझे घर आणि स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय तोडण्यात आले आहे. कुत्र्याच्या 5 पिलांना ठार करण्यात आले आहे.

    या पिलांचे फोटो अभिजीत सरकारने आपल्या फेसबुक हँडलद्वारे शेअर केली आहेत. कोलकाताच्या बेलिहाटा येथे प्रभाग क्रमांक 30 पासून हिंसाचार सुरू झाला आणि परेश पॉल आणि स्वप्ना समंदर या तृणमूल नेत्यांच्या नेतृत्वात हा सर्व प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. अभिजीत सरकारने फेसबुक व्हिडिओद्वारे विचारले की, हे लोक माणसं आहेत का? माझी काय चूक आहे? माझ्यावर का हल्ला करत आहेत?

    अभिजीतने म्हटले होते की कोणताही पक्ष जिंकला तरी मला अडचण नाही, परंतु त्यांचे घर क्रूरपणे पाडले जात आहे. हे दोन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अभिजीतला बेदम मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विविध माध्यमांतून म्हटलंय की, त्यांच्या जीविताला आता तृणमूलच्या गुंडांकडून धोका आहे.

    Bengal Violence Heart-wrenching video, BJP activist did Facebook Live twice before death, says Trinamool goons cruelty

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!